पांडव पंचमी, कड पंचमी, कार्तिक शुद्ध पंचमी

  दि.१८-११-२०२३,शनिवार.

आज कार्तिक शुद्ध पंचमी सकाळी ०९:१९ पर्यंत आणि त्यानंतर षष्ठी.

 * आज पांडव पंचमी, कड पंचमी *

चंद्र आज मध्यरात्री नंतर ००:०७ पर्यंत उत्तराषाढा नक्षत्रात आणि त्यानंतर श्रवण नक्षत्रात.आज गंड हा योग मध्यरात्री नंतर ०२:१७ पर्यंत आणि त्यानंतर वृद्धि.आज बालव हे दिवा करण सकाळी ०९:१९ पर्यंत आणि त्यानंतर तैतिल.आज कौलव हे रात्री करण २०:२२पर्यंत आणि त्यानंतर गरज.श्री गुरुदेव् माउली 🚩🚩

दि.१८-११-२०२३,शनिवार.  आज कार्तिक शुद्ध पंचमी

ज्या बाळाचा जन्म आज सकाळी ०७:०१ पर्यंत झालेला असेल त्या बाळाची रास धनु असेल आणि त्यानंतर जन्मणाऱ्या बाळाची रास मकर असेल.जय् हनुमान्

 *आजचा राहू काळ सकाळी ०९:१७ ते १०:५७ पर्यंत.*

 *आज चांगला दिवस.*

आपला आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जावो.ओम् शन् शनेश्वराय् न् मह्:  तुम्हि जगा दुसर्याला जगवा. सुप्रभातम् माउली🚩 🕉️ साइराम्🌹 ओम्  साइराम्🌹


आज शनिवार, स्तुती हनुमंताची

रूद्र म्हणू की तुज दास रामाचा|

अखिल विश्वासी आदर्श दास्य भक्तीचा|

कटी लंगोटी कसूनी, भाव हरिचा|

प्रणाम घ्यावा हे चिरंजीव हनुमंता ||१||

अंजनीच्या तपाचा परिपाक तू आहे|

पवनसूत म्हणुनी तुज हे विश्व पाहे|

नित्य मुखी श्रीराम मंत्र असे जयाचा|

प्रणाम घ्यावा हे चिरंजीव हनुमंता ||२||

बालपणीच सुर्यासी ग्रासण्यास धावे|

फळ समजुनी त्यास खाण्यास धावे|

भयभीत होऊनी सूर्य, करी प्रहार वज्राचा|

प्रणाम घ्यावा हे चिरंजीव हनुमंता ||३||

भिमकाय, वज्रदेही, मारुती, नामे तुज|

नित्य तुज प्रार्थीती यक्ष, गंधर्व, अदितीज|

काळ ही कापे चळचळा, पाहुनी दिव्य तेजा|

प्रणाम घ्यावा हे चिरंजीव हनुमंता ||४||

सप्तचिरंजीवात स्थान तव महान|

दास रामाचा तू महानाहूनी महान|

उगा न म्हणती तुज अवतार शंकराचा|

प्रणाम घ्यावा हे चिरंजीव हनुमंता ||५||

शनिदेव तुजला प्रसन्न होऊनी वर देई|

तुझ्या दर्शने भक्तांवर कृपा शनीची होई|

दास प्रमोद शरण, देई ठाव चरणांचा|

प्रणाम घ्यावा हे चिरंजीव हनुमंता ||६||

श्री गुरुदेव दत्त.


काकडा मारुतीचा 

ये पवनाच्या वेगे अंजनी सुता|

भक्त हे पातले दर्शना तव शिवस्वरूपा|

ओज, बल तेज यांच्या स्वामीनाथा|

ओवाळीतो काकडा  केसरी नंदना||१||

चैत्री पौर्णिमेस जाहले प्राकट्य तुझे|

जन्मताच रविबिंबास खाण्या निघे वायू वेगे|

मारता रविने वज्र, खुण हनुवटीवर जपता|

अजुनी ओळख ती मिरविसी मर्कट नाथा||२||

दश दिशा उजळल्या, वाहे मंद समीर|

अजुनी का निद्रेत माझा हनुमंत वीर|

गाई हंबरती भुकेली गोठ्यात वासरं|

सोडा निद्रा दे दर्शना झडकरी आता||३||

घेऊनी गोधनास पहा कृषिवल चालले|

घरट्यातील चिमणी पाखरे अंबरी उडाले|

रवि सहजच फेके किरण तव मूखावरी|

घेऊनी गदा हो सज्ज रक्षिण्या आता||४||

पाणवठ्यावर जमल्या ललना पाणी भरणा|

जागी झाली सृष्टी, राउळी नाद घंटेचा ठण ठणा|

घेऊनी उभा निरंजन हाती भक्त हा तुझा|

आळवितो रंगनाथसुत उघडी द्वार आता||५||

श्री गुरुदेव दत्त


सूर्यपुत्र शनिदेव

सुर्यपुत्र शनिदेवा, हे यमाग्रजा|

हाती घेऊनी सत्य आणि न्यायाची ध्वजा|

हे छाया मार्तंड सुता, कृपा करा|

मी शरण तुम्हा शनैश्चरा||१||

मंद मंद तुझा देवा फेरा|

दृष्टीचा तव चमत्कार न्यारा|

नको नको तो जन्ममृत्यूचा फेरा|

मी शरण तुम्हा शनैश्चरा||२||

शककर्ता विक्रम राजा उज्जनीचा|

गर्वाने त्याची बोलली ती वाचा|

त्यास दाविला तुम्ही साडेसातीचा खेळ न्यारा|

मी शरण तुम्हा शनैश्चरा||३||

प्रत्यक्ष गुरूनाथासी ना सोडले|

नेऊनी शुळापाशी परत आणिले|

तव लीलेच्या न जाणे कोणी अंतपारा|

मी शरण तुम्हा शनैश्चरा||४||

तुझ्या ठायी न कोणी मोठा न सान|

येता फेरा तुझा दाविसी तू निशाण|

परी आळविता तुज, होई कृपावर्षाव सारा|

मी शरण तुम्हा शनैश्चरा||५||

येता तव फेरा रघुत्तमासी|

धाडीसी वर्षे चौदा वनवासासी|

ग्रह सीतेस येता,आला दशाननाचा फेरा|

मी शरण तुम्हा शनैश्चरा||६||

वैकुंठेश्वरासी त्वा ना सोडिले|

स्यमंतकाचे त्यास डाग लागले|

हरिश्चंद्राचा गेला राजपाट सारा|

मी शरण तुम्हा शनैश्चरा||७||

किती आळवू तुज हे न्यायप्रिया|

सांभाळी मज, दे आश्रय सत्यप्रिया|

मी किंकर तव चरणांचा,हे ग्रहेश्वरा|

दास प्रमोद, तुम्हा शरण शनैश्चरा||८||


श्रीगुरुदेव दत्त