Posts

पत्रिकेत पितृदोष असेल तर.. हे नक्की करा दोष मुक्त व्हाल

Image
 पत्रिकेत पितृदोष असेल तर त्यावर उपाय व कोणती शांती करावी ? आणि नारायण नागबली,कालसर्प शांती, त्रिपिंडी श्राद्ध करणे आवश्यक आहे का ? खूप अडचणीत आहे ? उपाय :- सर्वात पक्का उपाय..  सकाळी आंघोळ झाल्यावर एक एक पिठाचा गोळा स्वहाताने बनवा. गोळा बनवताना मनात आपल्या पुर्वजांची माफी मागा आणि हा गोळा घराच्या मागच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवा की रस्त्यावरचा एखादा कुत्रा येऊन तो गोळा खाईल. जर तुम्ही flat system मधे रहात असाल तर बिल्डींग च्या मागच्या बाजूचा अंदाज घेऊन ठेवा. एकदा करून सगळेच पितृदोष एकदमच कमी होईल असे नाही.. महीन्यातून अधून मधून असे करणे.. जेवताना कधी कुत्रा दिसल्यास घास टाकणे.. दोष प्रमाण कमी जास्त यावर देखील अवलंबून आहे. आपण आपलं कर्म करत राहणे 

पितृपक्ष कथीत - भाग 1, भाग 2 आणि भाग 3

Image
  पितृपक्ष_भाग१_२_३ सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन पितृपक्ष या विषयी थोडि माहिती जाणून घेवु.श्रध्देने जे केले जाते त्याला श्राध्द अशी संज्ञा शास्त्रकारांनी दिली आहे. मृतव्यक्तींच्या उद्देशाने प्रतिवर्षी जे करतो त्याला सांवत्सरीक श्राध्द अशी संज्ञा आहे.पितृपक्षात जे श्राध्द करतात त्याला महालय श्राध्द अशी संज्ञा आहे. आपले आकाश हे 360अंश कल्पलेले असुन. सूर्य हा सहाव्या राशीत म्हणजे "कन्या "राशीत गेल्यानंतर तो वृश्चिक राशीत जाण्यापर्यंतचा काऴ जो जवऴपास दोन महिने असतो तो पर्यंत महालय श्राध्द करता येते. भाद्रपद कृ.1 ते भाद्रपद अमावास्या या कृष्णपक्षात महालय श्राध्द रोज करावे असे वचन आहे.सांप्रत सलग 15 दिवस श्राध्द करणे हे व्यावहारीक दृष्ट्या थोडे कठिण असल्याने वडिलांच्या निधन तिथीस किंवा अमावास्येला महालय श्राध्द एकदाच केले जाते. हा हि पक्ष मान्य आहे. सांवत्सरीक श्राध्दात त्रयीलाच उद्देशुन पिंडदान केले जाते (आई आजी पणजी किंवा वडिल आजोबा पणजोबा) परंतु महालय श्राध्दात सर्व नातेवाईकांना पिंडदान केले जाते. पितृत्रयी  -वडिल आजोबा पणजोबा मातृत्रयी -आई आजी पणजी मातामहत्रयी -आईचे वडिल

दि.१८-११-२०२३,शनिवार. आज कार्तिक शुद्ध पंचमी

Image
  दि.१८-११-२०२३,शनिवार. आज कार्तिक शुद्ध पंचमी सकाळी ०९:१९ पर्यंत आणि त्यानंतर षष्ठी.  *आज पांडव पंचमी, कड पंचमी* चंद्र आज मध्यरात्री नंतर ००:०७ पर्यंत उत्तराषाढा नक्षत्रात आणि त्यानंतर श्रवण नक्षत्रात.आज गंड हा योग मध्यरात्री नंतर ०२:१७ पर्यंत आणि त्यानंतर वृद्धि.आज बालव हे दिवा करण सकाळी ०९:१९ पर्यंत आणि त्यानंतर तैतिल.आज कौलव हे रात्री करण २०:२२पर्यंत आणि त्यानंतर गरज.श्री गुरुदेव् माउली 🚩🚩 ज्या बाळाचा जन्म आज सकाळी ०७:०१ पर्यंत झालेला असेल त्या बाळाची रास धनु असेल आणि त्यानंतर जन्मणाऱ्या बाळाची रास मकर असेल.जय् हनुमान्  *आजचा राहू काळ सकाळी ०९:१७ ते १०:५७ पर्यंत.*  *आज चांगला दिवस.* आपला आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जावो.ओम् शन् शनेश्वराय् न् मह्:  तुम्हि जगा दुसर्याला जगवा. सुप्रभातम् माउली🚩 🕉️ साइराम्🌹 ओम्  साइराम्🌹  *आज शनिवार, स्तुती हनुमंताची*  रूद्र म्हणू की तुज दास रामाचा| अखिल विश्वासी आदर्श दास्य भक्तीचा| कटी लंगोटी कसूनी, भाव हरिचा| प्रणाम घ्यावा हे चिरंजीव हनुमंता||१|| अंजनीच्या तपाचा परिपाक तू आहे| पवनसूत म्हणुनी तुज हे विश्व पाहे| नित्य मुखी श्रीराम मंत्र असे ज